कार कॅनॉलमध्ये पडली; २ जण वाहून गेल्याची भीती, एकावर उपचार सुरू

Foto

पैठण, (प्रतिनिधी) : कोरडगाव येथून पैठण तालुक्यातील चांगतपुरी मार्गाने पैठण तालुक्यातील पिंपळवाडीकडे स्विफ्ट गाडीने येत असताना रस्ता चुकून कॅनॉलच्या मार्गावर गेल्याने स्विफ्ट गाडी रिव्हर्स घेत असताना उजव्या कॅनलमध्ये पडली. यामध्ये तीन व्यक्ती होत्या. 
अल्ताफ इदाहीत पठाण (रा. हदगाव तालुका शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर), मुकीद अहमद शेख (३५ राहणार कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर) निलोफर मुकीद शेख (३० रा. कोरडगाव,  ता. पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर. यातील अल्ताफ इदाहीत  पठाण याच्यावर पैठण येथील लोंढे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. इतर दोघांचा शोध लागू शकला नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण वाहून गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे.